वृत्तसंस्था/ अँटीग्वा
कर्णधार क्रेग बेथवेटच्या समयोचित फलंदाजीच्या जोरावर येथे सोमवारपासून सुरू झालेल्या लंकेविरूद्धच्या दुसऱया कसोटीत यजमान विंडीजने पहिल्या डावात दिवसअखेर 86 षटकांत 7 बाद 287 धावा जमविल्या. ब्ा्रsथवेट 99 धावांवर खेळत होता. लंकेतर्फे लकमलने 3 गडी बाद केले.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा लंकेच्या गोलंदाजांनी बऱयापैकी फायदा उठविला. लंकेच्या लकमलने खेळाच्या पहिल्या सत्रात सुरूवातीला विंडीजचे कँपबेल बॉनर यांना लवकर बाद केले. कँपबेलने 5 धावा जमविल्या तर बॉनरला खाते उघडता आले नाही. त्यानंतर कर्णधार ब्रेथवेट आणि मेयर्स यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 71 धावांची भागिदारी केली. उपाहारावेळी विंडीजची स्थिती 3 बाद 71 अशी होती. व्ही. फर्नांडोने उपाहारापूर्वी मेयर्सला झेलबाद केले. त्याने 61 चेंडूत 8 चौकारांसह 49 धावा जमविल्या.
कर्णधार बेथवेटने एका बाजूने चिवट फलंदाजी करत संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. खेळाच्या दुसऱया सत्रात लकमलने ब्लॅकवूडला झेलबाद केले. त्याने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. धनंजय डिसिल्वाने माजी कर्णधार होल्डरला बाद केले. होल्डरने 34 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. ब्रेथवेट आणि होल्डर यांनी पाचव्या गडय़ासाठी 51 धावांची भागिदारी केली. चमिराने विंडीजच्या डिसिल्वाला एका धावेवर झेलबाद केले. ब्रेथवेटने जोसेफसमवेत सातव्या गडय़ासाठी 37 धावांची भर घातली. त्याने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. चहापानावेळी विंडीजने 7 बाद 222 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये विंडीजने एकही गडी न गमविता 65 धावा जमविल्या. ब्रेथवेट आणि कॉर्नवाल यांनी आठव्या गडय़ासाठी अभेद्य 65 धावांची भागिदारी केल्याने विंडीजने दिवसअखेर 86 षटकांत 7 बाद 287 धावा जमविल्या. कर्णधार ब्रेथवेट 11 चौकारांसह 99 तर कॉर्नवाल 1 षटकार आणि 6 चौकारांसह 43 धावावर खेळत होते. लंकेतर्फे लकमलने 71 धावांत 3 तर व्ही फर्नांडो, एंबुल्डेनिया, डिसिल्वा, चमिरा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेचा संघ विंडीजच्या भूमीत पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. संक्षिप्त धावफलक ः विंडीज प. डाव- 86 षटकांत 7 बाद 287 (ब्रेथवेट खेळत आहे 99, मेयर्स 49, कॉर्नवाल खेळत आहे. 43, जोसेफ 29, होल्डर 30, ब्लॅकवूड 18, कँपबेल 5, बॉनर 0, डिसिल्वा 1, लकमल 3-71, व्ही फर्नांडो 1-59, उंबुल्डेनिया 1-79, चमिरा 1-56, डिसिल्वा 1-16).