वृत्तसंस्था/ मुंबई
2022 च्या आयपीएल क्रिकेट हंगामातील रविवारी येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला षटकांचा वेग राखता न आल्याने या संघाचा कर्णधार रोहित शर्माला आयपीएलच्या नियमानुसार दंड करण्यात आला आहे.
या कारवाईनुसार आता कर्णधार रोहित शर्मा दंडापोटी 12 लाख रूपये मोजावे लागणार आहेत. मुंबई इंडियन्सला या सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून चार गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला होता.