बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील भाजप सरकारने मंगळवारी विरोधी पक्षातील जद (एस) च्या पाठिंब्याने राज्य विधानपरिषदेत जमीन मालकी सुधारणा विषयक विधेयक मंजूर केले, परंतु कॉंग्रेसने या विधेयकाविरूद्ध मतदान केले. काँग्रेसने याआधीही या विधेयकाला विरोध केला होता. त्यामुळे विधेयक मंजूर करताना काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
कर्नाटक लँड रिफॉर्म्स (दुरुस्ती) विधेयक, २०२० पूर्वी विधानसभेत मंजूर करूनही विधान परिषदेत रखडले होते. या विधेयकात कर्नाटक भूमी सुधार अधिनियम कलम ७९ ए, बी, सी सी हटविण्याचा विचार केला गेला, ज्यामुळे केवळ शेतकर्यांना आणि वर्षाकाठी दोन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या शेतजमिनींच्या खरेदीवर मर्यादा आल्या. दरम्यान मंगळवारी विधानसभेत जद (एस) चे पाठबळ मिळाल्याने हे विधेयक मंजूर करण्यात आले.