बेळगाव/प्रतिनिधी
कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री शशिकला जोल्ले यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह अहवालानंतर त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी त्यांना घरी अलग ठेवण्यात आलं आहे.
मंत्री जोल्ले यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी १४ दिवस स्वतःला घरात अलग ठेवणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी करून स्वतःला अलग ठेवण्याची विनंती करतो,” असं त्यांनी ट्विटरवर म्हंटल आहे.