बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्माई यांनी आज ११ वाजता मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली. बोम्माई हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री असणार आहेत. दरम्यान, नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आर. अशोक यांनी दिली आहे.
दरम्यान कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. याबाबत माहिती देताना भाजपचे ज्येष्ठ आमदार आर. अशोक यांनी सांगितले की, कर्नाटक राजभवनात संपन्न झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर बेंगळूरहून मंगळवारी संध्याकाळी बोम्माई दिल्लीसाठी रवाना होतील. यासाठी विशेष उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.