बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे आज क्षेत्राची पाहणी करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री आह उत्तर कन्नड जिल्ह्याच्या दौर्यावर असताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी येळ्ळापूर तालुका रुग्णालयाच्या ठिकाणी थांबून तेथील कोरोना लसीकरण केंद्राची पाहणी केली.
यावेळी, मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील कर्तव्यावर असलेले डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य व्यावसायिकांची भेट घेतली आणि तेथे दाखल असलेल्या रूग्णांची आणि बाह्यरुग्णांची योग्य ती काळजी घेऊन उपचार करण्याच्या सूचना केल्या.
त्यानंतर बोम्माई गेल्या पंधरवड्यात येळ्ळापूर, कारवार आणि अंकोला येथे सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बाधित झालेल्या भागाला भेट देतील आणि जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.