बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (यूपीएससी) रविवारी घेतल्या जणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना मदत करण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने हुबळी आणि बेंगळूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे.
यूपीएससी परीक्षार्थींसाठी सोडण्यात येणारी विशेष एक्स्प्रेस हुबळी ते यशवंतपूर (ट्रेन क्र. 07391) शनिवारी सायंकाळी पाच वाजता हुबळी येथून सुटेल तर दुसर्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता यशवंतपूरला पोहोचेल.
तर परीक्षा संपल्यानंतर परतीच्या दिशेने जाणारी यशवंतपूर – हुबळी स्पेशल एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 0739२) रविवारी रात्री आठ वाजता यशवंतपूरहून सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी ८.४५ हुबळीला पोहोचेल.