बळ्ळारी/प्रतिनिधी
कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातील हुविना हदगली गावात राहणारी १०० वर्षीय महिला कोरोनातून पूर्णपणे बारी झाली आहे. या महिलेचा महिन्याच्या सुरुवातीला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण आता या महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. हल्लम्मा असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.
“यामहिलेने डॉक्टरांनी मला चांगली वागणूक दिली. नियमित खाण्याबरोबरच मी दिवसातून एक सफरचंद खात असे. डॉक्टर मला टॅब्लेट आणि इंजेक्शन देत आहेत आणि मी आता स्वस्थ आहे. कोरोना हा एक सामान्य सर्दीसारखा आहे,” असे हल्लम्मा यांनी म्हंटले आहे.
या महिलेचा मुलगा, सून आणि नातू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पण लक्षणे सौम्य असल्याने त्यांच्यावर त्यांच्या घरी उपचार करण्यात आले होते.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी, तिचा मुलगा एका बँकेत नोकरी करतो आणि ३ जुलैला तो पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर १६ जुलैला हल्लम्मा या पॉझिटीव्ह आल्या. त्यांनतर २२ जुलै रोजी १०० वर्षांच्या वृद्ध महिलेने कोरोनावर मात केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.