अलूर
सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेतील अ गटातील लढतीत यजमान कर्नाटकला पंजाबविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. कर्नाटकने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकात 8 बाद 125 धावा केल्या तर प्रत्युत्तरात पंजाबने 14.4 षटकातच केवळ एका गडय़ाच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.
कर्नाटकच्या डावात बेळगावच्या रोहन कदमने सर्वाधिक 32 धावांचे योगदान दिले. मात्र, अन्य सर्व फलंदाजांनी निराशा केली. देवदत्त पडिक्कलने 19 तर पवन देशपांडेने 16 धावा केल्या. सिद्धार्थ कौलने 26 धावात 4 तर अर्शदीप सिंगने 18 धावात 2 बळी घेतले.
प्रत्युत्तरात पंजाबतर्फे प्रभसिमरने सिंगने नाबाद 89 धावांची झंझावाती खेळी साकारली. अभिषेक शर्माने 30 धावा जमवले. गुरकिरत सिंग मान 8 धावांवर नाबाद राहिला. रोनित मोरेने 2 षटकात 31 धावा मोजल्या. कृष्णप्पा गौतमला 28 धावात 1 गडी बाद करता आला.