बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांच्या आई होन्नूरम्मा यांचे शुक्रवारी पहाटे बळ्ळारी येथे निधन झाले, अशी माहिती श्रीरामुलू यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
होन्नूरम्मा यांना कोरोना उपचारासाठी बंगळूरच्या बॉरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयात दाखल केले होते. बरे झाल्यानंतर त्या दोन दिवसांपूर्वी बळ्ळारीला परतल्या होत्या. गुरुवारी रात्री त्यांची तब्येत खालावली आणि तिला बळ्ळारी येथील रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर आणि इतरांनी शोक व्यक्त केले आहे.