16 वर्षाखालील वयोगटातील चाचणीत यश
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे 16 वर्षाखालील निवड चाचणीत केएलएस स्कूलचा विद्यार्थी व बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू सिद्धेश अनिल असलकरची राज्याच्या 24 संभाव्य खेळाडूंत निवड झाली आहे.
धारवाड विभागीय 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत सिद्धेश असलकरने भरीव कामगिरी केली होती. त्या कामगिरीची दखल घेत त्याची संभाव्य यादीत निवड झाली होती. बेंगळूर येथे गेले 16 दिवस प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरानंतर त्याची संभाव्य 24 खेळाडूंत निवड करण्यात आली आहे. या 24 खेळाडूंमध्ये 2 संघ निवडून सामने खेळविण्यात येणार आहेत. त्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम 15 खेळाडूंची 16 वर्षाखालील विजय मर्चंट चषक स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. अ संघात रवी रेड्डी, बी. एन. लक्ष्मीसागर, तन्मय एम., अर्णव मिश्रा, रोहित अरवी, श्रेय ऋत्वीक काबालू, प्रणव बाबू, रौनक यलवाल, प्रणव अश्वत, मोनिष एस, गौरव शानभाग, कुशल गावडा तर ब संघात यश जाधव, रोहन रेवणकर, समित डी., आदेश अर्स, तणव प्रसाद, सिद्धेश असलकर, प्रणव भट्टड, अनुज एम. एस., हार्दीकराज, आदित्य पावलूर, राहु बेल्लद, शिवसमर्थ नागराज अशा दोन संघांत सामना होणार आहे.
सिद्धेशला धारवाड विभागीय संघटनेचे समन्वयक अविनाश पोतदार, प्रशिक्षक संगम बैलूर, विवेक पाटील, प्रमोद पालेकर, बाळकृष्ण पाटील यांचे मार्गदर्शन तर केएलएस स्कूलचे चेअरमन उज्वला मंडगी, मुख्याध्यापिका नंदिनी मुतालिक-देसाई, सारिका नाईक व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभत आहे.