बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. राज्यात गुरुवारी कोरोना संक्रमित लोकांची संख्या अडीच लाखावर गेली. कर्नाटकात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,५६,९७५ इतकी आहे. एकूण रुग्णांपैकी १,७०,३८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ८२,१४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे ७,३८५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर यशस्वी उपचारानंतर ६,२३१ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गुरुवारी १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात एकूण मृतांची संख्या ४,४४५ झाली आहे. यापैकी १६ रुग्णांचा मृत्यू अन्य आजारामुळे झाला आहे. तर राज्यात आयसीयूमध्ये ७०५ रुग्ण दाखल आहेत.
राज्यात गुरुवारी २५,९८९ जलद प्रतिजैविक चाचण्या आणि ३३,६१४ आरटी-पीसीआर चाचणीद्वारे एकूण ५९,६०३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण २२,५६,८६२ लोकांची तपासणी झाली आहे.