बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी कर्नाटकने एकूण चार लाख कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला. राज्यात एकूण रुग्णांपैकी एकट्या राजधानी बेंगळूरमध्ये ३७ टक्क्यांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना संसर्गाची पहिली नोंद 8 मार्च रोजी झाली होती. तथापि, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत सुमारे ३ लाखाहून अधिक लोक बरे झाले आहेत.
२६ ऑगस्ट रोजी राज्यात एकूण प्रकरणांची संख्या तीन लाखांवर गेली असल्याने गेल्या १२ दिवसांत एक लाखांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. कर्नाटकमध्ये एकूण कोरोना बाधितांची संख्या ४,०४,३२४ वर पोहचली आहे. राजधानी शहरात हीच संख्या १,०८,६४२ इतकी आहे. सद्यस्थितीत राज्यात, ९७.००१ रुग्ण उपचारात असून त्यापैकी ३९,६६९रुग्ण राजधानी बेंगळूर मधील आहेत.