बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाऊनमुळे बंद असणारी पदवी, अभियांत्रिकी आणि डिप्लोमा महाविद्यालये मंगळवारी पुन्हा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्देशानंतर कर्नाटकातील उच्च शिक्षण संस्थांनी वर्ग नियमित पुन्हा सुरू केले.
कोरोना साथीच्या गंभीर परिस्थितीमुळे आणि देशभरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून शाळा व महाविद्यालये बंद होती. ती आजपासून सुरु झाली. दरम्यान प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने अद्याप शाळा व पूर्व-विद्यापीठ महाविद्यालये सुरू करायची की नाही याबाबत निर्णय बाकी आहे.