बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह दर कमी कमी होत आहे. सोमवारी राज्यात कोरोना बाधितांची संख्या घटली. राज्यात ६०० नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात १२८३ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सध्या १०,२०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १२,११० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात २९८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ७२८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर एका कोरोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या उपचारात असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ६,६९१ इतकी आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ४,३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.