बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ८,१६१ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर मंगळवारी राज्यात ६,८१४ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे एकूण ८२, ४१० सक्रिय रुग्ण आहेत.
मंगळवारी राज्यात चोवीस तासात एकूण १४५ कोरोना-संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला, त्यापैकी ६१ जणांचा मृत्यू बेंगळूरमध्ये झाला आहे.