बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोनाचा वेग कमी होत आहे. राज्यात गुरुवारी ९५२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर १,२८२ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत घरी परतले. राज्यात गुरुवारी ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सध्या ११,२७१रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच राज्यात आतापर्यंत १२,०९० रुग्णचा मृत्यू झाला आहे. नवीन लोकांमध्ये कोरोना संसर्गाची पुष्टी झाली आहे.
राज्यात कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. गुरुवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ५५४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ८४९ रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. दरम्यान जिल्ह्यात सध्या ७,२३३ रुग्ण उभारत आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ४,३१७ जणांचा मृत्यू झाला आहे.