बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यभरात कोविड -१९ प्रकरणात वाढ होत असून गेल्या सात दिवसात (१७ मार्चपासून) जवळजवळ १२,३४१ लोकांना संसर्ग झाला असल्याची माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिली
आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाच्या माहितीनुसार, १२,३४१ रुग्णांपैकी ७,८५१ रुग्ण एकट्या बेंगळूर शहरी जिल्ह्यतील आहेत. तसेच राज्यात झालेल्या ५४ रुग्णांच्या मृत्यू पैकी ३३ जण बेंगळूरमधील आहेत. आजपर्यंत ९.७५ लाख लोकांनी कोरोनाही लागण झाली आहे. तर एकूण मृत्यूची संख्या १२,४६१ आहे.