बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकार या दीपावलीच्या फटाक्यांवर बंदी आणत आहे, कारण याआधी कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकार याविषयी निर्णय घेत आहे. फटाके बंदीची अंतिम घोषणा मुख्यमंत्री येडियुरप्पा करतील असे राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले आहे.
गुरुवारी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी राज्यातील कोरोना तज्ञ समिती आणि तांत्रिक सल्लागार समिती यांच्यासमवेत बैठक घेतली यावेळी समितीने कोरोनामुळे दीपावली दरम्यान फटाक्यांवर बंदी घालायच्या फायद्याविषयी आणि बाधक गोष्टींवर विचार विनिमय केला आणि त्यांनी फटाक्यांवर बंदी घालण्याची शिफारस केली.
फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना संसर्ग झालेल्या आणि तसेच नसलेल्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, म्हणून आम्ही समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवू आणि ते एक किंवा दोन दिवसात अंतिम निर्णय घेईल, असे मंत्री सुधाकर म्हणाले.