यादगीर/प्रतिनिधी
बस पास देण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे अनेक महाविद्यालय व शाळांतील हजारो विद्यार्थी ऑनलाइन पास मिळविण्यासाठी धडपडत आहेत. ऑनलाईन पासमुळे विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा, पोचपावतीची प्रत आणि त्यांच्या स्वाक्षरीसाठी महाविद्यालयाच्या किंवा शाळेच्या प्रमुखांकडे अर्ज घेऊन जावे आणि ज्या ठिकाणाहून पास काढायचा आहे त्या ठिकाणी रांगेत उभे रहावे लागत आहे. यासाठी शोरापूर येथील केंद्राकडे जावे लागत आहे. परंतु नेटवर्कच्या समस्यांमुळे ऑनलाईन अर्ज सबमिट करणे सोपे नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.