बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी ६९९७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. राज्यात दररोज कोरोनाचे कमी जास्त रुग्ण सापडत आहेत. राज्यात बुधवारी त्याच वेळी ५४६० रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. त्या सर्वांना रुग्णालयातून बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी गेल्या चोवीस तासात राज्यात एकूण ३८ कोरोना-संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यन राजधानी बेंगळूरमध्ये मंगळवारी ३,५४७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९४,६५२ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी राज्यात 56,398 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३९,९७१ वर पोहोचली. बुधवारी ३,५३६ रूग्ण बरे झाल्याने घरी परतले. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत २७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.