बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपच्या कर्नाटक संघटनेने नवीन राज्य शिस्त समिती स्थापन केली असून, अध्यक्षस्थानी हुबळीचे भाजपचे वरिष्ठ नेते लिंगराज पाटील असणार आहेत. समितीमध्ये इतर सदस्यांमध्ये टीपटूरचे आमदार बी. सी नागेश, बागलकोटचे पी. एच. पुजार, कोडगूचे रीना प्रकाश आणि बेंगळूरचे ई. अश्वथनारायण हे आहेत. समितीचा कार्यकाळ २०२१ ते २०२३. पर्यंत आहे, असे भाजपने एका निवेदनात म्हटले आहे.