बेंगळु/प्रतिनिधी
कोवॅक्सिन चाचण्या राज्यात यशस्वी होणार आहेत आणि कोविड -१९ लस वितरणासाठी कर्नाटक पूर्णपणे तयार आहे, असे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. व्यादेही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर येथे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या तिसरा टप्प्याच्या शुभारंभानंतर ते बेंगळूर येथे बोलत होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमास सामील झाले.
डॉ. सुधाकर यांनी कर्नाटकसाठी ही अभिमानाची बाब आहे की देशभरातील १२ राज्यांतील २५ केंद्रांवर क्लिनिकल चाचण्या होत आहेत. २६ हजार लोकांना लस दिली जात आहे. एकट्या आमच्या राज्यात १६०० ते १८०० लोकांना कोविड लस दिली जात आहे. या चाचणी काळात लोकांना अफवा आणि चुकीच्या माहितीपासून सावध राहायला हवे, असे ते म्हणाले.