बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये सोमवारी ४२६७ नवीन कोरोना बाधित आढळले तर ५,२१८ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवारी केवळ २२,६२० नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, जी मागील १० दिवसातील सर्वात कमी आहे. राज्यात आतापर्यंत १,८२,३५४ लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ९९,१२६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. ७९,९०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर कोरोनामुळे आतापर्यंत ३,३१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी ११४ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हंटले आहे. तर आयसीयूमध्ये ६८१ रुग्ण दाखल आहेत. सोमवारी राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ५४.३६ टक्के होता आणि मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के होते.
बेंगळूर शहरात सोमवारी १,२४३ नवीन रूग्णांची पुष्टी झाली. यासह, संक्रमित लोकांची एकूण संख्या ७५,४२८ वर गेली आहे. यापैकी ४१,१६६ रुग्ण बरे झाले आहेत तर ,३२,९८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १,२७६ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी ३६ रुग्णांचा मृत्यू सोमवारी झाला आहे. तर सोमवारी २,०३७ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.