बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकात सोमवारी कोरोना संसर्गाची ६,३१७ नवीन प्रकरणे आढळली तर७,०७१ हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली. तर राज्यात ११५ जणांचा मृत्य झाला आहे. यासह राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४,०६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त, कोरोना नसलेल्या आणि अन्य आजाराने १६ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. राज्यात एकूण २,३३,२८२ रुग्णांपैकी १,४८,५६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर ८०,६४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ६९५ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.
सोमवारी घेतलेल्या ३७,७०० नमुन्यांपैकी आरएटीची संख्या १४,८६६ आणि आरटी-पीसीआरची संख्या २३,२११ आहे. आतापर्यंत एकूण २०,७५,०८६ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. सोमवारी राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३. टाके आणि मृत्यूचे प्रमाण १.७४ टक्के होता.
बेंगळूर शहरात सोमवारी २,०५३ नवीन रुग्ण आढळले तर २१९० रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले. एकूण ९१,८६४ रुग्णांपैकी ५५,९७२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ३४,४०८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १४८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.