बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने मंगळवारी २० लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या केल्याचे म्हंटले आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने या चाचण्या २३ मार्च ते १६ ऑगस्ट दरम्यान घेतल्या असल्याचे म्हंटले आहे. यासह, कर्नाटक देखील जास्तीत जास्त चाचण्या घेणार्या पहिल्या राज्यांपैकी एक आहे.
केआयडीडब्ल्यूएआय बेंगळूरने सर्वाधिक चाचण्या (१,०५,६२४) घेतल्या आहेत. त्यानंतर गुलबर्गा जीआयएमएस (८८,३२३), एनआयएमएचएएनएस (८१,८१६) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (७९,५९५) या सरकारी प्रयोगशाळांचा समावेश आहे.
दरम्यान, न्युबर्ग आनंद खासगी लॅबमध्ये सर्वाधिक चाचण्या (६९,८९७) घेतल्या तर १६ ऑगस्टपर्यंत सर्व खासगी प्रयोगशाळांमध्ये एकूण ४.५ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत.