बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये मंगळवारी ५२९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर चार बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ५२९ पॉझिटिव्ह रुग्णांसह राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ९,३६,९५५ वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या १२,२०४ वर गेली आहे, अशी माहिती कर्नाटकच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मंगळवारी सायंकाळी हेल्थ बुलेटीननुसार राज्यात ७३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या ६,६३३ रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात आतापर्यंत ९,१८,०९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात २७६ नवीन बाधितांची भर पडली आहे. तर दोन संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत एकूण ३,९७,६०९ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण ४,३८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ३,८८,९६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी ४५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या ४,२६४ सक्रिय प्रकरणे आहेत.