बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी राज्यात कोरोनाचे ५०१८ रुग्ण सापडले. तर राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. सोमवारी ८,००५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी परतले. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ७, ७०, ६०४ वर पोहोचली आहे. यापैकी ६,५३,८२९ रूग्णांनी कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे. तर राज्यात १,०६,२१४ रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १०,५४२ रुग्ण मरण पावले आहेत. राज्यात आयसीयूमध्ये ९३२ रुग्ण दाखल आहेत. तुमकूर आणि बेंगळुरू शहरी जिल्हा वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन रूग्णांची संख्या २०० पेक्षा कमी होती.
सोमवारी राज्य विमानतळावर ६६४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. गेल्या दोन आठवड्यांत ५,४८,८११ प्राथमिक आणि ५,०६,४२४ दुय्यम संपर्क म्हणून ओळखले गेले. गेल्या एका आठवड्यात राज्यात एकूण १,०१,०४७ लोकांना घरात अलग ठेवण्यात आले आहेत.
गेल्या २४ तासांत एकूण ७८,५८१ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये १२,७६७ जलद प्रतिजैविक आणि ६५,८१४ आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत एकूण६५,४६,३५८ कोरोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.