बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी ब्लॅक फंगसच्या उपचारात वापरल्या जाणार्या लिपोसोमल अॅम्फोटेरिसिन बीच्या अतिरिक्त ५,२४ कुपी कर्नाटकला देण्यात आल्या सांगितले.
गौडा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्नाटकात आज लिपोसोमल अॅम्फोटेरिसिन बीच्या अतिरिक्त ५,२४ कुपींचे वाटप करण्यात आले आहे. बेंगळूर उत्तरचे खासदार असलेले मंत्री म्हणाले, रुग्णांना त्याचा सहज पुरवठा व्हावा यासाठी आतापर्यंत एकूण ६०,३५० कुपी राज्याला देण्यात आल्या आहेत.
देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासह औषधांच्या मागणीत अचानक वाढ होण्याकरिता सरकारने अॅम्फोटेरिसिन बी औषधांची उपलब्धता वाढविण्यासाठी विविध पावले उचलली आहेत.
मंत्री गौडा म्हणाले की, आज सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना लिपोसोमल अॅम्फोटेरिसिन बी च्या अतिरिक्त ६१,१२० कुपी वाटप केल्या गेल्या आहेत. आतापर्यंत देशभरात अंदाजे ९.९ लाख कुपींचे वाटप करण्यात आले असून ते म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना पुरेशी उपलब्धता ठेवत आहेत.