बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने गेले काही दिवस पडत असेलला संततधार पाऊस आणि त्यामुळे झालेले नुकसान राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी केंद्राला पत्र देण्याचे ठरवल्यानंतर काही तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्राकडून कर्नाटकाला बचाव व मदत कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
पंतप्रधान मोदी कर्नाटकातील विविध भागात पाऊस आणि पूर परिस्थितीवर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी बोलले आहेत. त्यांनीराज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आम्ही पूरग्रस्त नागरिकांच्या सोबत आहेत. राज्यात सुरू असलेल्या बचाव व मदत कार्यात केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ट्विटच्या माध्यमातून दिले आहे.
आज सकाळी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उत्तर कर्नाटकातील अनेक भागांत आलेल्या पुराच्या संदर्भात आपत्कालीन मदत निधी म्हणून ८५.४९ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त, पुरात नुकसान झालेल्या ५१८१० शेतकर्यांना ३६.५७ कोटी रुपयांची सबसिडी ऑनलाईन जाहीर करण्यात आली असल्याचे सांगितले.