बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकला कोविशिल्ड लसीचे ७.५ लाख डोस मिळाले आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी म्हटले आहे. त्यांनी केंद्र सरकारने राज्यासाठी ४.५ लाख अतिरिक्त डोस वाटप केले आहेत, असे सांगितले. तसेच के. सुधाकर यांनी राज्यासाठी अधिक लसींची मागणी करण्यासाठी सोमवारी ते दिल्लीला जाणार असल्याचे साेगितले.
दरम्यान राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर कोरोना लस घेण्यासाठी लोक पुढे येत आहेत, परंतु नियमित लस पुरवठा होत नसल्याने बेंगळूरसह राज्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर पुन्हा कोणतेही लस उपलब्ध असल्याचे बोर्ड लटकलेले नाहीत. तसेच बेंगळूर मधील अनेक रुग्णालयांसह अनेक लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लोकांना निराश होऊन परतावे लागत आहे.