कबंगळुर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शुक्रवारी केंद्र सरकारकडून काही दिवसांत राज्यात १३.९ लाख कोविड -१९ लसीच्या कुपी मिळण्याची अपेक्षा असल्याचे म्हंटले आहे.
बेंगळूर शहरातील हेब्बळ येथील एस्टर सीएमआय रुग्णालयात कोरोनाच्या लसीकरणासाठी दुसर्या ड्राय रनची तपासणी केल्यानंतर सुधाकर यांनी कर्नाटकसाठी मोठी चांगली बातमी म्हणजे मला उद्या किंवा परवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कदाचित आम्हाला राज्यात लसांच्या १३.९ कुपी मिळणार आहेत. आमच्या सर्वांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे, असे ते म्हणाले.
राज्यात आतापर्यंत ६,२०,००० आरोग्य सेवेची नोंद झाली आहे ज्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल. तसेच ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही अशा व्यक्तींना वैद्यकीय किंवा दंत महाविद्यालयात, आम्ही त्यांना नोंदणी करण्याची विनंती केली आहे, असे ते म्हणाले.