क्रीडा प्रतिनिधी
बेळगावमधील ऑटोनगर येथील कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या केएससीए स्टेडियमवर सुरू असलेल्या सी. के. नायडू चषक 23 वर्षाखालील युवा क्रिकेटपटूंच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी चौथ्या दिवशी यजमान कर्नाटक संघाने पाहुण्या आंध्रपदेश संघावर 7 गडी राखून निर्विवादपणे विजय साजरा केला.
मंगळवारी तिसऱया दिवशी आंध्रप्रदेश संघाने 74 षटकात 7 गडी गवावून 174 धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील 13 धावांची आघाडी घेवून आंध्रप्रदेश संघाने 187 धावांची आघाडी घेतली होती. बुधवारी सकाळी उर्वरित सामन्याला सुरूवात झाल्यानंतर आंध्रप्रदेश संघाने 87.5 षटकात सर्वगडी गमावून 228 धावा काढल्या. यावेळी कर्नाटक संघातर्फे किसन बर्डे यांने आंध्रप्रदेश संघाचा निम्मा संघ तंबूत पाठविताना 64 धावात 6 गडी बाद केले. यावेळी व्ही. वैशाकने 3 तर अभिलाष शेट्टी यांने 1 बळी घेतला. यावेळी आंध्रप्रदेशने कर्नाटक संघाकडे 242 धावांचे आव्हान विजयासाठी ठेवले होते. प्रस्तुतरादाखल खेळताना कर्नाटक संघाने 60.5 षटकात 3 गडी गमावून 247 धावा काढल्या. यावेळी बेळगावची खेळपटी यापूर्वी फलंदाजाना नंदनवण ठरत गेली मात्र या स्पर्धेत हिरव्यागार खेळपटीने गोलंदाजाना साथ दिली. अशा खेळपटीवर कर्नाटकाच्या फलंदाजाचा कस लागला होता. मात्र आज जिद्द व चिकाटीच्या जोरावर कर्नाटकाच्या अंकित उड्डाप्पा शिवकुमार बी यू ,एन. जयेश, सुजय सातेरी यांनी कर्नाटकचा डोलारा हालता ठेवत संयमी फलंदाजी करत आंध्रप्रदेशच्या गोलंदाजाचा योग्य तो समाचार घेत विजयाला गवसणी घातली.
बुधवारी सकाळी कर्नाटक संघाचा अंकित उड्डाप्पा व शिवकुमार बी. यू यांनी खेळाची सुत्रे स्वतःजवळ ठेवत पहिल्या गडय़ासाठी 19.3 षटकात 81 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यावेळी अंकित उड्डाप्पा यांने 66 चेंडूना सामोरे 24 धावा काढल्या. अंकित उड्डाप्पा याला आंध्रप्रदेशच्या प्रणयकुमार यांने त्रिफळा बाद केले. यावेळी शिवकुमार बी. यू यांने एन. जयेश याला साथीला घेऊन दुसऱया गडय़ासाठी 102 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत कर्नाटक संघाला विजयाच्या समिप पोहचविले.
शिवकुमार बी. यू यांने झझांवती फटकेबाजी करताना 146 चेंडूना सामोरे जात 111 धावांची दमदार शतकी खेळी केर्लीं. शिकुमार बी. यू. कर्नाटक संघाला मोठे योगदान मिळाले. शिवकुमार बी. यू याला महादीप कुमार यांने यु.एम. एस. गिरीनाथ यांच्याकडे झेल देण्यास भाग पाडले. यावेळी एन जयेश 112 चेंडूत 57 धावा तर बेळगावनगरीचा सुपूत्र व कर्नाटक संघाचा उपकर्णधार सुजय संजय सातेरी यांने संयमी फलंदाजी करताना 23 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. सुजय संजय सातेरी यांने आंध्रप्रदेशच्या वेणु कोंडा याला लेगसाईडला चौकार मारत कर्नाटकचा विजय संपादन केला.
कर्नाटक संघाला प्रशिक्षक दीपक चौगुले, एन. सी. एwयप्प फिजिओ मंजुनाथ, टेनर पी राजू व व्यवस्थापक बी. के कुमार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कर्नाटकने संघाने तीन सामन्यात मिळून एकूण 15 गुण संपादन केले आहे.