बेंगळूर/प्रतिनिधी
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) बुधवारी कर्नाटकातील दक्षिण कन्नड, उडुपी, कोडगू आणि हसन या चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सायंकाळी ४ वाजताच्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांत येत्या तीन ते चार तासांत मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने कलबुर्गी मधील सर्वाधिक कमाल तापमान (35.6 डिग्री सेल्सिअस) आणि दावणगिरी मधील सर्वात कमी 19.3 डिग्री सेल्सिअस तपमान देखील असल्याचे सांगितले. दरम्यान पुढील २४ तास बेंगळूर शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.