बेंगळूर/प्रतिनिधी
२०११ च्या जनगणनेनुसार, आरोग्य विभागाने गुरुवारी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची अंदाजे लोकसंख्या ५४,८७,३९९ असल्याचे म्हण्टले आहे. १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत केवळ चार टक्के म्हणजेच २,१७,०८५ वयोवृद्धांना लस देण्यात आली आहे.
राज्यात ९,११,३३६ ज्येष्ठ नागरिक असलेल्या ३० जिल्ह्यांमध्ये बेंगळूर शहरामध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ९१,३१२ ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत आहे जे राज्यात सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकाची ज्येष्ठ नागरिकांची संख्या बेळगाव जिह्यात आहे. एकूण ४,४७,९५३ नागरिकांपैकी ६,८७६ जणांना लसीकरण करण्यात आले आहे, जे केवळ १.५ टक्के आहे.
म्हैसूर मध्ये २,७९,१८५ ज्येष्ठ नागरिक असून त्यापैकी ३.६ टक्के व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. तुमकूरमध्ये २,६९,५८५ ज्येष्ठ नागरिक असून त्यापैकी ७.२ टक्के नागरिकांना लस दिली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात २,०१,६०९ ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ६.६ टक्के नागरिकांनी लस घेतली आहे.