हुबळी/प्रतिनिधी
हुबळी शहरात दारू खरेदीसाठी मद्यपींनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान राज्यात पूर्ण लॉकडाऊन असल्याने राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार दुकाने उघडण्याची मुभा आहे. हुबळी जिल्हा प्रशासनाने सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत दारू विक्री करण्याची परवानगी दिली आहे. हा ऑक्सिजन पुरवठा १२ हजार टन मागणीपेक्षा कमी झाला आहे. कमी वेळ असल्याने दारू खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या.
दरम्यान आज हुबळी शहरात दारूची दुकाने उघडल्यानांतर मद्यपींनी सकाळी दारू खरेदीसाठी रांगाच्या रांगा लावल्या होत्या. यावेळी शहरातील ठीक ठिकाणी असणाऱ्या दारूच्या दुकानांवर दारू खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले.
हुबळी शहरात सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत नागरिकांनी दारू दुकानांसमोर दारू खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी मद्यपींनी कोरोना नियमांचे पालन करत दारू खरेदी केली. तसेच दारू दुकानदारांनाही यावेळी योग्य ती खबरदारी घेतल्याचे पहायला मिळाले.