बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज (बुधवार ७ जुलै २०२१) विस्तार होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे. शपथविधी आज संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवन येथे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील चार खासदारांची पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. यामध्ये राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर, चिक्कमंगळूर खासदार शोभा करंदळजे, चित्रदुर्गचे खासदार ए. नारायणस्वामी आणि बिदरचे खासदार भगवंत खुभा यांना मंत्रीमंत्रिपद देण्यात आली आहेत.
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आज बैठक झाली. या बैठकीला चंद्रशेखर, शोभा करंदळजे आणि नारायणस्वामी हे पंतप्रधानांनी सकाळी बोलावलेल्या नव्या मंत्रिमंडळांच्या बैठकीला उपस्थित होते. खुभा यांना आज पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. भगवंत हैदराबादहून दिल्लीला रवाना झाले. अलीकडील दिवसांमध्ये ही पहिली वेळ आहे जेव्हा कर्नाटकला केंद्रीय मंत्रिमंडळात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे.