बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज कमी जास्त होत आहे. सोमवारी, कर्नाटकात कोरोना संसर्गाची १,१५१ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे त्याचवेळी २४ जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. सोमवारी राज्यातील १,४४२ लोकांना बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्याच वेळी, राज्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या २०,२५५ झाली आहे.
दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यात २७० नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात २३६ नवीन रुग्णांची भर पडली आहे.