कृष्णापुर-कुमठोळ आडमार्गा सीलबंद : 24 तास पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी / वाळपई
कर्नाटक राज्यातून गोव्यामध्ये आडमार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या संशयावरून गोवा सरकारने गोवा कर्नाटक दरम्यानच्या कृष्णापुर भागातून येणाऱया नागरिकांसाठी गोव्यातील कुमठोळ याठिकाणी दोन्ही राज्य दरम्यानचा मार्ग सीलबंद केलेला आहे .आजपासून कुमठोळ येथे कार्यवाही सुरू झाली असून पुढील आदेशापर्यंत कुमठोळ या ठिकाणी 24 तास पोलिस पहारा ठेवण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून गेल्या आठ दिवसांपासून कृष्णापुर याकर्नाटक राज्यातील गावातून आडवाटेने सदर भागातील नागरिक गोव्यामध्ये येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते .याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. याबाबतची माहिती अशी की जागतिक स्तरावर कोरोना रोगाने निर्माण केलेली गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात सतर्कता जाहीर करण्यात आलेली आहे .दुसरी महत्त्वाची बाब अशी गोव्याच्या शेजारी असलेल्या कर्नाटक व महाराष्ट्र भागांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे .यामुळे गोव्यामध्ये यासंदर्भात विशेष सतर्कता बाळगण्यात आलेली आहे .गोव्यात येणारे सर्व महाराष्ट्र व कर्नाटक भागातील मार्ग सीलबंद करण्यात आलेले आहेत .तरीसुद्धा आडवाटेत या मार्गातून गोव्यामध्ये काही नागरिक प्रवेश करीत असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांचे म्हणणे आहे .त्यामुळे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन यासंदर्भात आठवाटेचे सर्व मार्ग सीलबंद करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आजपासून कर्नाटकातील खानापूर तालुक्मयातील कृष्णापुर याभागातून जंगल परिसरांमधून गोव्यात येणारा मार्ग आजपासून सीलबंद करण्यात आलेला आहे. यामुळे कोणालाही सदर मार्गातून गोव्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.
कृष्णापुर हा सर्वात जुना मार्ग
दरम्यान गोव्याच्या शेजारी कर्नाटक राज्य आहे. या राज्यातून गोव्यात प्रवेश करण्यासाठी सध्यातरी चोर्ला व अनमोड हे दोन प्रमुख मार्ग आहेत. राज्यामध्ये कोरोना रोगाच्या धर्तीवर हे दोन्ही मार्ग सरकारने एक महिन्यापूर्वी सीलबंद केलेले आहेत .तरीसुद्धा गोव्यात वेगवेगळय़ा कामानिमित्त आजही मोठय़ा प्रमाणात कर्नाटक भागातील नागरिक वेगवेगळय़ा भागांमध्ये अडकून पडलेले आहेत .पैकी काही नागरिक आडवाटेतून गोव्यात येण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब समोर आलेली आहे.यासाठी काही नागरिकांनी अत्यंत जुन्या असलेल्या व सध्या वापरात नसलेला कृष्णापुर हा मार्ग स्वीकारल्याचे समजते. गेल्या आठ दिवसांपासून दुचाकी व चालत अनेक नागरिक गोव्यामध्ये आल्याचे स्थानिक भागातील नागरिकांचे म्हणणे आहे .यामुळे कर्नाटक भागात निर्माण झालेली रोगाची गंभीरता यामुळे गोव्यामध्ये याचे विपरीत परिणाम झाल्यास सरकारची दैनावस्था होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. नागरिकातर्फे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस खात्याचे उत्तर गोवा अधीक्षक उत्कृष्ट प्रसन्नू यांनी मंगळवारी संध्याकाळी या भागांमध्ये घेऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ृ<CeeHegj भागातून गोव्यात येणाऱया मार्गसंदर्भात सविस्तर माहिती घेतली व कुमठोळ याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस यंत्रणेला सदर मार्ग पूर्णपणे सीलबंद करण्याचा आदेश दिलेला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी आज सकाळपासून सुरू झालेली आहे. सदर ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 24 तास हा बंदोबस्त जारी राहणार असल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱयांचे म्हणणे आहे . त्यामुळे सदर भागातून कोणीही आल्यास त्याला तपासणी केंद्रावर अटक करून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे माहिती व पोलीस निरीक्षक शिवराम वायगणकर यांनी दिली.
कृष्णापुर याठिकाणी नैसर्गिक ठिकाणी प्रवेश बंद
दरम्यान गोव्याच्या म्हादई अभयारण्य व कर्नाटकाच्या भीमगड यांच्यादरम्यान कृष्णापुर याठिकाणी असलेला परिसर म्हणजे पर्यटन व निसर्गप्रेमीसाठी एक आनंदाचा परिसर आहे. याठिकाणी खास करून उष्णतेच्या दिवसात यानिसर्गाचा आनंद घेण्यासाठी गोव्यातील मोठय़ा प्रमाणात निसर्गप्रेमी याभागांमध्ये जात असतात. सध्यातरी गोवा सरकारने सदर ठिकाणी जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केल्यामुळे आता कुमठोळ या ठिकाणी पुढील आदेशापर्यंत जाता येणार नसल्याचे समजते. त्यामुळे निसर्गप्रेमींना एका आनंदाच्या क्षणाला यंदा मुकावे लागणार असल्याचे समजते. या ठिकाणी जाण्यासाठी कुमठोर बंदीरवाडा ,काजरेधाट अशा गावातून जावे लागते. रस्ता पूर्णपणे जंगली स्वरुपाचा असलातरी सदर ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळय़ा प्रकारचा आनंद अनुभवण्याची चांगली संधी निसर्गप्रेमींना मिळत असते. कृष्णापुर भागातून कर्नाटक भागातील नागरिक चोरटय़ा मार्गाने येत असल्याच्या संशयावरून रस्ता बंद केल्यामुळे आता कृष्णापुर याठिकाणी गोवेकरांना तूर्तास मुकावे लागणार असल्याचे समजते.