बाधितांची संख्या 614 वर, मृतांचा आकडा 25
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकात रविवारी आणखी 13 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण बाधितांची संख्या 614 वर पोहोचली असून आतापर्यंत कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी सायंकाळी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार गुलबर्गा येथील एका 13 वर्षाच्या मुलीसह पाच जणांचा यामध्ये समावेश आहे. तर बागलकोट जिल्हय़ातील बदामी व मुधोळ येथील तिघा जणांचा समावेश आहे. तर बेंगळूर शहरातील चौघा जणांचा समावेश आहे.
यामधील बहुतेक जणांना कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व चौघा जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 22 जणांची राज्यातील वेगवेगळय़ा इस्पितळातून मुक्तता करण्यात आली आहे.
म्हैसूर येथील 11, बागलकोट, विजापूर येथील प्रत्येकी 4, चिक्कबळ्ळापूर, बेंगळूर व बळ्ळारी येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. कोरोनाबाधितांची संख्या बेंगळूर शहरात 149 वर पोचली आहे तर ही संख्या म्हैसूर येथे 88 वर आहे. 73 रुग्णसंख्या असलेले बेळगाव तिसऱया क्रमांकावर आहे.