बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. पूर्ण लॉकडाऊननंतर राज्यात कोरोनाचा वेग मंदावला. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ३८ हजाराहून कमी आहे. राज्यात गेल्या नऊ दिवसात कोरोनाचे २३,३४८ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात २,२९० नवीन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. तर ३,०४५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात शुक्रवारी ६८ रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.४८ टक्के होते. तर मृत्यू दर १.२४ टक्के होता.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,६७,१५८ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २७,९३,४९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३५,७३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३७,९०६ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ४७२ रुग्ण आढळले. तसेच जिल्ह्यात १२ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत १२,१८,४९३ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ११,८९,२३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५,७२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७.५९ टक्के आहे. तर मृत्यू दर १.२९ टक्के आहे.