बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कर्नाटकात सुमारे २.८४ लाख लोकांना लस देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
“जगातील सर्वात मोठी लसीकरण ड्राइव्ह आता वेगवान लसीकरण ड्राइव्ह झाली आहे. १६ जानेवारी रोजी प्रक्षेपणानंतर भारताने अवघ्या ११ दिवसांत २ दशलक्ष लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे, से सुधाकर यांनी ट्विट केले.
दरम्यान कर्नाटकात गुरुवारपर्यंत २,८४,385 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले आहे, गुरुवारी एकाच दिवसात १८,२३० रोगप्रतिबंधक लस टोचली गेली.