बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी धोका अजून टळलेला नाही. कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. आता राज्यात कोरोनाचा वेग कमी झाला आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारी ४८ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यात कोरोना मृतांच्या संख्येने ३६ हजाराचा आकडा ओलांडला आहे. तसेच ३६ हजार कोरोना मृतांचा आकडा ओलांडल्यानंतर कर्नाटक देशात मृतांच्या संख्येत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. तर १.२६ लाख कोरोना मृत्यूसह महाराष्ट्र अग्रेसर आहे.
दरम्यान तथापि, त्याकडे पाहण्याची सकारात्मक बाजू आहे. राज्यात शेवटच्या १ हजार मृत्यू सात दिवसांच्या कालावधीत नोंदवले गेले, जे मृत्यू कमी होत असल्याचे सूचक आहे. यापूर्वी कर्नाटकात मृतांची संख्या सहा दिवसांत ३२ हजार वरुन ३३ हजारांवर, तीन दिवसांत ३१ हजारावरून ३२ हजारावर, तीन दिवसांत ३० हजारावरून ३१ हजार झाली आणि दोन दिवसांत २९ हजारावरून ३० हजारावर गेली.
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात १,९७७ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ३,१८८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात गुरुवारी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. गुरुवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.४२ टक्के होते. तर मृत्यू दर २.४२ टक्के होता.