बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरूच आहे. धक्क्कादायक बाब म्हणजे राज्यात कोरोनाचा वेग एका आठवड्यात जवळपास दुप्पट झाला आहे. गेल्या आठवड्यात, १२ मार्च रोजी, राज्यात जास्तीत जास्त ८३३ प्रकरणे नोंदली गेली होती, १९ मार्च रोजी ही संख्या १५८७ वर गेली आहे. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्याही एका आठवड्यात ८११४ वरून १२०६७ पर्यंत वाढली आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार राज्यातील विविध जिल्ह्यातून ८६९ रूग्ण बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी परतले तर कोरोना संक्रमित दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोरोनाची सर्वाधिक संख्या असणाऱ्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक १०३७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तर ५३० रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.