बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये सोमवारी विक्रमी लसीकरण झाले. ९२,०३९ ज्येष्ठांसह एकूण १,२५,८४६ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर दुष्परिणामांची नोंद झालेली एकही घटना घडली नाही. लसींमध्ये, गंभीर आजारांनी ग्रस्त ४५ ते ६० या वयोगटातील २०,७४६ लाभार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एकूण ४,२९,८९२ वयोवृद्धांना लस देण्यात आली आहे.
दरम्यान ३,२२१ आरोग्य कर्मचार्यांनी पहिला आणि ३,५१३ जणांनी दुसरा डोस दिला. १,८९४ फ्रंटलाइन कामगारांनी पहिला तर ४,४३३ जणांना दुसरा डोस घेतला. दरम्यान सोमवारी १६ जानेवारी ते सायंकाळी ५.३० या कालावधीत राज्यात एकूण १४,९६,७५५ नागरिकांना लस देण्यात आली आहे.