बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोना रुग्णवाढ ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. शुक्रवारी कर्नाटकमध्ये कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या ८,६५५ ने वाढली आहे. त्याच वेळी, कोरोनावर मात करत घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ५,६४४ होती. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९८,४७४ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी राज्यात गेल्या २४ तासात ८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शुक्रवारी राज्यात ५९,९१९ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.