बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २४ हजारापेक्षा कमी आहे. राज्यात गुरुवारी २,०५२ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर १,५३१ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर राज्यात गुरुवारी ३४ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९,०१,२४७ वर पोहोचली आहे. तर यापैकी २७,४६,५४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २३,२५३ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. जिल्ह्यात गुरुवारी ५०५ रुग्ण आढळले. तर याचवेळी ३७६ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ९ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.