बेंगळूर/प्रतिनिधी
आयएमडीने या आठवड्यात कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पावसाला पुन्हा जोर मिळणार आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) कर्नाटकातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून काही ठिकाणी अलर्ट जरी केला आहे.
आयएमडीच्या मते, १ सप्टेंबरपासून द्वीपकल्पात पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. दक्षिण कर्नाटक प्रदेशातील जिल्ह्यात १ सप्टेंबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने या भागात ऑरेंज अलर्ट जरी केला आहे.
आयएमडीने २ सप्टेंबर रोजी किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटक अंतर्गत प्रदेशात मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.