बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना प्रसाराचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी राज्यात बाधित रुग्णांची संख्या २९ हजाराच्या वर गेली. एकूणच शनिवारी राज्यात २९,४३८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याच वेळी, विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या २०८ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी राज्यात ९,०५८ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. दरम्यान राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या वाढून २,३४,४८३वर पोहोचली आहे. तर शनिवारपर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण १४,२८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी राज्यात सकारात्मकतेचा दर १५.५२ टक्के होता.
शनिवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात नवीन रुग्णांची संख्या १७,३४२ वर पोहोचली. जिल्ह्यात दररोज बाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान शनिवारी ४,६४६ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत. तसेच २४ तासात जिल्ह्यात १४९ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.