बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना प्रसाराचा वेग वाढत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. राज्यात दिवसागणिक वाढणारी कोरोनाची संख्या चिंता वाढवणारी आहे. शुक्रवारी कर्नाटकात सुमारे पाच महिन्यानंतर राज्यात पाच हजार पर्यंत नवीन प्रकरणांची नोंद झाली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कर्नाटकात पहिल्यांदाच एकाच दिवसात ५ हजार रुग्ण आढळले होते आणि ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण आढळले.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ३६ हजाराहून अधिक रुग्ण उपचारात आहेत. राज्यात २४ तासांत ४,३७३ नवीन रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान राज्यात शनिवारी ४,३७३ बाधितांची नोंद झाली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णालयातून १,९५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कर्नाटकात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ३६,६१४ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे एकूण १२,६१० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आयसीयूमध्ये ३२७ रुग्ण दाखल आहेत.
राज्यात बाधितांही सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. शनिवारी जिल्ह्यात ३,००२ जणांना कोरोनाची लागण झाली. तर १०५२ रुग्ण यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून घरी परतले आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत ४,६६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.